एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन फाटकाजवळ उभी आहे आणि लोक तिथून आपापल्या कार, बाईकने फाटक क्रॉस करत आहेत. यावेळी मोटरमॅन लोकांना थांबवण्यासाठी सतत हॉर्न वाजवतोय पण लोकांवर त्याचा काही फरक पडत नाही. यावेळी काही लोक शहाणपणाने थांबतात. परंतु बहुतेक लोक ट्रेन थांबली याकडे दुर्लक्ष करत आपले वाहनं घेऊन पुढे निघून जातात. ट्रेन सतत हॉर्न वाजवत असतानाही अनेक लोक निष्काळजीपणे वागत असल्याचे दिसतेय. यावेळी दोन व्यक्ती हातात लाल आणि हिरवा झेंडा घेऊन येतात, यानंतर एक एक करु दोन्ही बाजूच्या वाहनांना थांबवत ट्रेनचा जाण्यासाठी वाट मोकळी करुन देतात.
Video
Pakistan Railways 😭
https://x.com/choga_don/status/1704546571780768157?s=20