पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला शुभेच्छा देणाऱ्या चाहत फतेह अली खान या विचित्र नावाच्या गायकाचे वर्ल्ड कप साँग प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यात हा गायक मजेशीर अंदाजात आपल्या पाकिस्तानी टीमला शुभेच्छा देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून त्यास एक दशलक्षहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडीओत चाहत फतेह अली खान पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला चिअर करताना दिसत आहे. चाहत फतेह अली खान ‘जीतेंगे भाई जीतेंगे’ असे गाताना दिसत आहे.
‘जीतेंगे भाई जीतेंगे’ … पाकीस्तानी टिमसाठी गायकाने गायलेल्या गाण्याचं झालं हसू..
- Advertisement -