Saturday, May 18, 2024

गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत, उद्धव ठाकरेंचा मोदी शाहंवर घणाघात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर, तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील प्रचार सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणाला साधला. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी नकली सेना असल्याचे म्हटले आहे. त्याला आता पालघर येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गद्दाराचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत. ते आमच्यावर टीका करत आहेत. मोदी तुम्ही महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला नकली म्हणता आहात. नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का ? त्यांचे दुसरे खंडणीखोर अमित शाहा हे शिवसेनेला नकली म्हणत आहेत. भाजप भेकड, भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका ठाकरे यांनी केलीय.ठाकरे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी आम्ही पालघरमध्ये प्रचार केला. मोदींना कठीण काळात साथ देणाऱ्या शिवसेनेला मुळासकट संपविण्याचे भाषा केली आहे. नकली सेना म्हणून तुम्ही आमची टिंगल, टवाळी करत आहात. पण अमित शाह तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपवाले किती बसले ते बघा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles