Thursday, January 23, 2025

पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

नांदगाव पंचायत समिती येथील सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले यांनी तक्रारदार यांचे कार्यालयातील टेबलचा चांगला तपासणी अहवाल करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना या लाचखोर अधिकाऱ्यास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.नांदगाव पंचायत समिती कार्यालयाचे सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले हे तक्रारदार यांचे कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी येणार होते. कार्यालयात तक्रारदार यांची टेबलची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून व चांगले तपासणी अहवाल देतो म्हणून नवले यांनी तीन हजार रुपये द्या. अशी तीन हजार रुपये यांची लाचेची मागणी केली तसेच यातील तक्रार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदाडे याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्याच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या.

मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण आठ हजार लाज स्वीकारून तक्रारदार यांची दप्तर तपासणीचे तीन हजार रुपये व जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याची पाच हजार रुपये असे मिळून एकूण आठ हजार रुपये घेताना नांदगाव पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी साडेचारचे सुमारास रंगेहाथ मिळून आले. म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम सात व सात अ अन्वेय गुन्हा दाखल करण्याचे काम नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील पो.हवा. सुनील पवार, संदीप वनवे, योगेश साळवे नाशिक युनिट यांनी कारवाई केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles