Friday, December 1, 2023

कार्तिकी एकादशीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात नो एंट्री, मराठा समाज आक्रमक..

कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्याच्या हस्ते करावी, असे पत्र सकल मराठा मोर्चाने दिले मंदिर समितीला दिले आहे. एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. मात्र कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना एन्ट्री न देण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चाने केला आहे.

मराठा आरक्षणासाठी सध्या वातावरण तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरात आक्रमक होत असून सकल मराठा समाज बांधव देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: