Saturday, January 18, 2025

पंढरपूरात विठ्ठल मंदिराच्या तळघरात आढळल्या भगवान विष्णूच्या पुरातन मूर्ती…

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले. मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू आहे. फरशीचे काम करत असताना एक पोकळी दिसून आली. साधारणपणे पाच ते सहा फूट खोल एक खोली आहे. पुरातत्त्व विभागाने मंदिरात आढळलेल्या तळघराची पाहणी केली. यामध्ये विष्णूच्या दोन, तर महिषासुरमर्दिनी, तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच काही जुनी नाणीदेखील आढळली. या मूर्ती साधारणपणे सोळाव्या शतकातील असतील, असे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे सह अध्यक्ष, अभ्यासक आणि महाराज मंडळींच्या उपस्थितीत तळघरातील या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या.

येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामामुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे लांबून दर्शन सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात असून, रविवारी (दि. २) विठ्ठलाचे पदस्पर्श म्हणजेच देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन सुरू होणार आहे. हे संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिरातील हनुमान दरवाजा म्हणजे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेऊन बाहेर पडताना डाव्या हाताला फरशी बदलण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणचा दगड काढला असताना खोल अंधार दिसून आला. संबंधित कामगारांनी मंदिर समितीला ही माहिती दिली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांनी तत्काळ पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles