Friday, January 17, 2025

नगर शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळा, खा. विखे, मा. आ. कर्डिले यांनी घेतली भेट

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांच्या वतीने चाळीसगाव येथे व्यास भागवत कथेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता प्रदिपजी मिश्रा यांचा प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील भव्य कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातही व्हावा या अनुषंगाने सदर ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत सुजय विखेंनी प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने आणि सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी सुजय विखे यांनी बोलून दाखविला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles