मात्र पाणीपुरी खाणं जीवावरही बेतू शकते, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर..पण हे खरं आहे. आत्ताच समोर आलेल्या व्हिडीओमधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पाणीपुरी खायच्या आधी दहा वेळा विचार कराल.
सोशल मीडियावर खाद्यपदार्थांच्या मायक्रोस्कोपिकचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. फ्रिजमधील शिळा भात, पिकलेलं केळं याच्यात काय असतं, हे मायक्रोस्कोपखाली दाखवण्यात आलं. आता पाणीपुरीच्या पाण्याचाही व्हिडीओ चर्चेत आला आहे. गाडीवरील पाणीपुरीच्या पाण्याच्या एका थेंबावर एका व्यक्तीने प्रयोग केला. पाणीपुरीच्या पाण्याचा एक थेंब मायक्रोस्कोपमध्ये ठेवण्यात आलं. आधी भाज्यांचे कण दिसत होते. काही वेळाने एक अळीही रेंगाळताना दिसली, हे पाहून तर तुम्हाला उलटीच आली असेल.
पाणीपुरी खाताय….हा व्हिडीओ पाहून तुम्ही पाणीपुरी खायच्या आधी दहा वेळा विचार कराल!
- Advertisement -