ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील महाराष्ट्रातील काही भागात पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आजपासून अर्थातच 7 नोव्हेंबर पासून ते 11 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आजपासून रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, जत, अक्कलकोट, विटा, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, लातूर, दौंड, बारामती, पुणे, जुन्नर, नाशिक, ओतूर, उदगीर, निजामाबाद, देगलूर, ओझर, मुंबई, अहमदनगर, केज, धारूर, आंबेजोगाई, हिंगोली, नांदेड, पूर्णा, वसमत, सेलू, परभणी, माजलगाव, गंगापूर, वैजापूर, जालना, सिल्लोड, पुसद, चिखली, नाशिक, वाशिम, कन्नड, मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वनी, श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर या भागात अवकाळी पाऊस पडू शकतो.
आज पासून ते 11 तारखेपर्यंत या संबंधित भागातील 30 किलोमीटरच्या परिघात पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात कमी पाऊस बरसणार आहे पण दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात या कालावधीमध्ये जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.