भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, यावर्षी मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान होण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रज्ञ पंजाबराव डख यांच्या मतानुसार, यावर्षी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश 28 मे ते 3 जूनदरम्यान होईल. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनची प्रवेश झालेला असून, त्याचा पुढील प्रवास मालदीव, कोमोरिन आणि बंगालच्या उपसागरात झाल्याचे आयएमडीने नमूद केले आहे.
गेल्या वर्षी एल निनो परिस्थितीमुळे भारतभर अल्प पाऊस झाला होता. परंतु यावर्षी एल निनोची परिस्थिती संपुष्टात आल्याने चांगला पाऊस अपेक्षित आहे. ला निना परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे. दुपारपर्यंत तापमानात वाढ होईल, त्यानंतर वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने अशा परिस्थितीची शक्यता वाढते.