Saturday, May 18, 2024

राज्यात ‘या’ कालावधीत बरसणार अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांनी केले शेतकऱ्यांना सावध….

7 ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 7 ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह गार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार, तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचाही अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पूर्व विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान, विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे. 7 मेच्या आधी हळद, कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 7 मेपासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 6 मेपर्यंत कांदा, कापूस, हळद पिकांची काढणी करुन ते नीट झाकून ठेवा, असा सावधगिरीचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles