Wednesday, April 30, 2025

“दारू पिण्याला मी नाही म्हणत नाही” पण….रक्तदान शिबीरात पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

“दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही”, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्याने पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात
गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील रक्तदान केलं. रक्तदान करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी आरोग्याबाबत संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना तंबाखू खाऊ नका असाही सल्ला दिला.

“दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका. त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही. मात्र तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा. तसेच खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तुम्ही सर्वांनी चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे. मांस, मच्छी, व्हेजिटेरियन असं काही खा आणि हेल्दी रहा, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

माझा एचबी 14 आहे मी हेल्दी आहे. मला वेळेवर कोणी जेवायला देत नाही तरीसुद्धा मी हेल्दी आहे. मला रक्ताची भीती वाटते, असं देखिल पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडे आपल्या विविध वक्तव्यांनी आणि कार्यकर्त्यांमधील संवादाने बऱ्याचवेळा चर्चेत येतात.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात. या सर्वांनी यावेळी आपआपल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी. तसेच गोपीनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यावे, असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles