एरवी राजकीय मैदानात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे शाब्दीक लढा आणि वैचारीक लढा जरी पाहायला मिळत असला तरी आता धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी औक्षण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्याच्या मंत्रिपदी नियुक्तीनंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. यासोबत त्यांना शुभेच्छाही दिल्या. याचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. त्यातील शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे.
राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव @Pankajamunde ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे. pic.twitter.com/4WY9t6dBCK
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 7, 2023
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 7, 2023