Thursday, January 16, 2025

प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य….जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

भाजपाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे या सध्या जिल्ह्यात त्यांचा प्रचार करत आहेत. पंकजा मुंडे यांनी आज (२७ मार्च) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात प्रचारास सुरुवात केली. यावेळी काही मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची गाडी अडवली, त्यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले, यासह ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजीदेखील केली. दरम्यान, पोलिसांनी यावेळी आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला केला. पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रचारावेळी झालेल्या या गोंधळाबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गोंधळ घालणारे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंधित नसावेत, असंही पंकजा म्हणाल्या.
पंकजा मुडे म्हणाल्या, काळे झेंडे दाखवणारे लोक फार नव्हते. चार-पाच जणच तिथे होते. त्यांच्याकडे काळे झेंडेदेखील नव्हते. त्यांनी खिशातून रुमाल काढून दाखवले. आसपासच्या गावात इतर नेत्यांनाही अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. हे तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवतायत. केवळ मलाच नाही तर इतर नेत्यांनाही काळे झेंडे दाखवत आहेत. मी पोलिसांना सांगितलं आहे की, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. परंतु, काहींनी तिथे गोंधळ घातला, आरडाओरड सुरू केली. मला असं वाटतं की, ते रुमाल दाखवणारे चार-पाच लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील आसावेत. परंतु, बाकीचे जे गोंधळ घालणारे लोक होते ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील असतील असं मला वाटत नाही. मला वाटतं ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles