Sunday, July 14, 2024

बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव , धनंजय मुंडें म्हणाले…या सगळ्या पराभवाची जबाबदारी…

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून त्यात केंद्रात एनडीएला बहुमत मिळालं. महाराष्ट्रात मात्र महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या. महायुतीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जागा २२ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. त्याती सर्वाधिक चर्चेत राहिलेली जागा म्हणजे बीडची. बऱ्याच चर्चांनंतर उमेदवारी देण्यात आलेल्या पंकजा मुंडे यांचा शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवाने यांनी अवघ्या ६ हजार ५५३ मतांनी पराभव केला. महाराष्ट्रातील हा निकाल चर्चेत असताना पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडेंच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. या पराभवाचं मला दु:ख आहे. खंत आहे. बीडच्या जनतेचे मी आभार मानतो की देशात सर्वाधिक मतदान झालेल्या पहिल्या बारा उमेदवारांमध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं. त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला याचं दु:ख मला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles