विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांचा बैठकांचा सिलसिला सुरु होता. त्यानंतर आता भाजपने आज पाच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी.