कालची विधान परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझी प्रतिक्रिया ही आहे की मी सगळ्यांचे आभार मानते. संघटनेचे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे हे सर्व माझ्या मागे आहेत. म्हणून हे सर्व शक्य झालं. संपूर्ण यश हे या सर्वांचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.राजकारणात आणि निवडणुकांमध्ये जय-पराजय हा चालतच असतो. देशातील 10 बड्या नेत्यांची नावं काढली तरी तेही कधी ना कधी संघर्षाला समोरे गेले आहेत. त्यामुळे 2019 ला विधानसभेला माझा पराभव झाला. पण 2024 ची लोकसभेची निवडणूकच वेगळी होती. त्याला मी पराभव मानतच नाही. अटीतटीच्या लढाईत सहा लाख 75 हजार मतं मी घेऊ शकले. देशातील सर्वोच्च मतं घेणाऱ्यांची यादी केली. तर तशी मतं आपल्याला मिळाली आहेत. या निवडणुकीत लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. थोडक्यात घासून तो पराभव झाला. त्याला मी पराभव मानत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
येणाऱ्या निवडणुका आम्हाला चॅलेंज असणार आहेत. पण कालच्या निवडणुकीमुळे पुढील निवडणुका त्यांच्या चार्जिंग सोपं होत चालला आहे… आगामी निवडणुकांमध्ये आमचा विजय रिअल समोर दिसतोय, असंही पंकजा म्हणाल्या.