Tuesday, February 11, 2025

पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीस….

भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास 19 कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. त्यामुळे लोकसहभाग व लोकचळवळीतून 19 कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी केली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता. असे असतानाच आता वैद्यनाथ कारखान्याकडे कर्ज थकीत प्रकरण समोर आले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून ही प्रक्रिया हाती घेतली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles