Sunday, February 9, 2025

पंकजा मुंडे अखेर ‘आमदार’ झाल्या…. विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ…

विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते.

५ वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर लगेचच भाजपने त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles