एवढे दिवस वनवास भोगला आहे.. बापरे… वनवास हा शब्द म्हटला, तर पाच वर्षांचाच असावा कलियुगात बाबा.. त्या जुन्या काळात होतं १४ वर्ष, आम्हाला पाच वर्षच खूप झाला. तुम्ही आहात ना माझ्याबरोबर? कुठेही गेले तरी आहात ना? शिखरावर गेले तर? दरीत गेले तर? नदीत गेले तर? कोरड्या आडात उडी मारली तर? म्हणजे मी पडून मेले नाही, तर तुम्ही वरुन पडणारच आहात माझ्यावर, असं पंकजा मुंडे बीडमधील सभेत बोलत होत्या
मला माहिती नाही इश्वराने माझ्या भाग्यात काय लिहिलंय.. आतापर्यंत जे काही लिहिलं होतं, तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त मला फार काही मिळालं नाही.. माझ्या जीवनावर मी फार काही बोलत नाही, पण मी फार दुःख, वेदना, यातना प्रत्येक पुरुषाच्या आणि स्त्रीच्या जीवनात असतात, त्या भोगून झाल्या आहेत. त्या भोगून झाल्यानंतरही कधी कधी माझ्या चेहऱ्यावर नको असतानाही हसू घेऊन मी बाहेर येते, ते केवळ तुमच्यामुळे, तुम्ही नसाल तर खड्ड्यात गेलं ते पद, तुमचं प्रेम नसेल तर मी काही नाही, असंही पंकजा म्हणाल्या.