बीड: लोकसभा निवडणुकीमध्ये हाय होल्टेज ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आणि नवनिर्वाचित खासदारांची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका आमदार पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपीठात बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. जातीय निहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांच्यावरती करण्यात आलेला आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या तीन दिवस आधी अचानक 7 बूथ जाहीर झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला, हे बूथ नोटिफायड नव्हते असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेनंतर खासदार बजरंग सोनवणे यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस पाठवली आहे. बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंकजा मुंडे यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी फेरमतमोजणी मागणी करण्यात आली.