एक बाबा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्यक्तीला पंखा बाबा असं म्हणतात. हा बाबा फिरता पंखा आपल्या हातांनी रोखतो आणि भक्तगणांना आशीर्वाद देतो. या पंखा बाबाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.या पंखा बाबाचा दरबार नेमका भरतो कुठे? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हिडीओंमध्ये तुम्ही पाहू शकता की भक्तगण त्यांना आपल्या समस्या सांगतात. मग बाबा फिरता पंखा आपल्या हातांनी रोखतात आणि मग त्यांना आशीर्वाद देतात. लक्षवेधी बाब म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे हात पंख्यापर्यंत पोहचावे म्हणून सेवक मंडळी त्यांना उचलून घेतात.
पंखा बाबा…फिरता पंखा आपल्या हातांनी रोखतो आणि आशीर्वाद देतो…Video
- Advertisement -