बॉलीवूडमधील ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. काजोल आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षं अधिराज्य गाजवत आहे. तिला अभिनयासाठी बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. शिवाय २०११ साली काजोलला ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे. तिच्या ‘कुछ कुछ होता है’ या सुपरहिट चित्रपटाला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील तिची अंजली ही भूमिका प्रेक्षकांना अजूनही खूप आवडते. अशातच सध्या काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तिच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
सेलिब्रिटी ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर काजोलचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, एक पापाराझी काजोचा व्हिडीओ काढता काढता पडतो. यावेळी काजोल थांबते आणि त्याला त्याचा मोबाइल उचलून देते. मग ती मार्गस्थ होते. काजोलच्या याच कृतीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.