गुरुवारी धनंजय मुंडे परळीत जात असतानाच परळी मधे कार्यकर्त्यांनी स्वागताचे मोठमोठे फ्लेक्स लावले आहेत. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.पंडित आण्णा मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचेही फोटो झळकवले आहेत.
याबाबत धनंजय मुंडे यांना विचारले असता त्यांनी, नुकतेच राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे महायुतीचेसरकार आलेले आहेत. साहजिकच या तिन्ही पक्षाच्या जेष्ठ नेत्यांचे फोटो कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. जर कार्यकर्त्यांना त्यात आनंद मिळत असेल तर आपणही त्यांच्या आनंदात सहभागी झाले पाहिजे अशी पृष्ठी धनंजय मुंडे यांनी केली. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर धनंजय मुंडे यांनी मला याबाबत काही माहिती नसून याबद्दलची माहिती मुंबईतूनच मिळेल असे सांगत याबाबत अधिक बोलणे टाळले.