काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसला आहे. वरपुडकरांचं परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आलं आहे. आमदार वरपुडकर हे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष होते. पण विभागीय सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरवलं आहे. विभागीय सहनिबंधकांनी वरपुडकरांच्या अपात्रतेचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सुरेश वरपुडकर जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याच्या कारणाने बँकेचे संचालकत्व अपात्र ठरविले आहे. महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ (1)(फ) आणि (2) नुसार दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून वरपुडकर यांना अपात्र ठरविले आहे.
मोठी कारवाई….जिल्हा बँकेचे अध्यक्ष ठरले अपात्र, कर्ज थकबाकी भोवली…
- Advertisement -