Tuesday, April 23, 2024

खासदारकीला तिकिट नाही, पण सहा महिन्यात आमदार करणारच, अजितदादांचा शब्द…

राजेश विटेकर याला मी परभणी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितले होते. तो देखील मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरत होता. पण महायुतीमध्ये ही जागा महादेव जानकर यांना सोडावी लागली. मी राजेश विटेकर याला थांबायला सांगितले. त्यामुळे मी परभणीकरांना शब्द देतो की येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये राजेश विटेकरला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय राहणार नाही, अशी जाहीर ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विजयी संकल्प मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, राजेश विटेकरला तयारी करायला सांगितली पण महादेव जानकर यांना प्रतिनिधित्व देण्याचं महायुतीमध्ये ठरलं. महादेव जानकर यांनी परभणी लोकसभेची जागा मागितली होती. त्यामुळे महायुतीमधल्या सर्व जणांनी सर्व जातीला सामावून घेण्यासाठी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे ठरविले. त्यानुसार महादेव जानकर यांना परभणीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. असे असले तरी मी राजेश विटेकरकडे दुर्लक्ष करणार नाही. येणाऱ्या सहा महिन्यात राजेश विटेकर याला मी विधानभवनामध्ये घेऊन जाईन, असा विश्वास परभणीकरांना अजित पवारांनी दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles