Tuesday, April 23, 2024

अजित पवार फडणवीस यांच्या समोरच म्हणाले….कुणी मायचा लाल…

परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर सडकून टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, आज विरोधकांना बोलण्यासाठी मुद्दा राहिलेला नाही. त्यांच्याकडून लोकाची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याची टीका केली.

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत. त्यापूर्वी एवढी कामे कधीही झालेली नव्हती. त्यांचे उद्याच्या दहा वर्षांचे व्हिजनही ठरलेले आहे. विरोधक मात्र भाजप 400 पार गेले, तर संविधान बदलतील, असा प्रचार करत आहेत. मात्र, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान कुणी मायचा लाल बदलू शकत नाही, असे पवारांनी ठासून सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles