Wednesday, April 17, 2024

महादेव जानकर म्हणतात….माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही…

ष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव जानकरांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीसांसह पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेतच जानकरांनी माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.महादेव जानकर म्हणाले, मला महायुतीच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणी लोकसभेची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी अजित पवारांसह महायुतीच्या सर्वच पक्षांचा आभारी आहे. परभणी जिल्ह्यासाठी मी एमआयडीसी, एअरपोर्ट आणण्यासाठी प्रयत्न करणार असून समृद्धी महामार्गाला परभणी जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्दच महादेव जानकरांनी यावेळी परभणीकरांना दिला आहे. माझी कुठं शाळा नाही, कॉलेज नाही, काय भानगड नाही. माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही, त्यामुळे काळजी करु नका. माझं ध्येय्य जनतेसाठीच असणार आहे. पिटेकर साहेब माझ्यानंतर तुमच्या मुलाला संधी मिळेल. मी त्यावेळी अजितदादा, फडणवीसांना विनंती करीन की मला उत्तर प्रदेशातून निवडणूक लढू द्या, तिकडून मी निवडणूक लढवेन, मला जनतेने दत्तक घेतलं आहे त्याचं पारणं मी चांगलं फेडणार असल्याचंही आश्वासन महादेव जानकरांनी यावेळी परभणीकरांना दिलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles