राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानेही पत्रकार परिषद घेऊन जागावाटपावर भाष्य केले. अजित पवार गटाच्या वतीने शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सुनील तटकरे यांना याआधीच उमेदवारी जाहीर केली होती. आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातली परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय जाहीर केला.