“लोकसभा निवडणुकीची लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या कर्तुत्वातून लढाई लढली. शिवाय शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनीही चांगला प्रचार केला. येत्या 4 तारखेला निकाल लागेल. तेव्हा उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरीज असतील. महविकास आघाडीच्या किमान 30 ते 35 जागा निवडून येतील. महायुतीच्या किती येतील मला माहिती नाही. महाविकास आघाडी निवडून येईल, हे मी आत्मविश्वासाने सांगतो” असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे उमेदवार संजय जाधव म्हणाले. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. जाधव म्हणाले, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. वर्षानुवर्षे आपण एकाच ठिकाणी राहतोय. निवडणुकीमुळे एवढा वाद होण्याचे कारण नाही. वैचारीक लढाई असली पाहिजे, ती जातीवर गेली. भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे. संविधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अशी वक्तव्य करणे लोकशाहीसाठी घातक होती, असंही जाधव यांनी सांगितले.