शिवसेनेतील फुटीनंतर आता कोणते आमदार अपात्र ठरणार याचा निकाल पुढील वर्षु १० जानेवारीला लागणार आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार पडणार असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानहानी टाळून आपली प्रतिमा राखायची असेल तर राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंपुढे शरणागती पत्कारावी. झाकली मूठ ठेवून ३१ डिसेंबरपुर्वीच राजीनामा द्या, असा सल्ला परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
शरण से मरण टल सकता हे हे रामायणातील उदाहरण देत संजय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना माफी मागण्याचा सल्ला दिलाय.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीनंतर एकनाथ शिंदे यांना संपवणे किती जड आहे, असा टोला खासदार जाधव यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाने व्हीप हा सुनील प्रभूंचा असल्याचे सांगितल्यानंतर हे लोक म्हणतात आम्हाला व्हीप मिळालाच नाही. जर, व्हीप मिळाला नव्हता तर मग सरकार अल्पमतात आल्याचं सांगायला राज्यपालांकडे का गेला होता,असा सवाल खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केलाय.