आजकालच्या मुलांकडे अभ्यास न करण्याची अनेक कारणं असतात. कधी आजारपण, कधी खेळ. प्रत्येक दिवशी मुलं नव-नवी कारणं शोधतात. पण टिक टॉकवर सध्या एका मुलाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्याचे अभ्यास न करण्याची कारणं ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल. दरम्यान या सगळ्यात मुलांबरोबरच पालकांनाही मुलांच्या अभ्यासाचं गृहपाठाचं टेन्शन असतं. अशावेळी कधी कधी पालकांनाही या मुलांचा अभ्यास किंवा गृहपाठ पूर्ण करुन द्यावा लागतो.मात्र आता पालकांचंही आणि मुलांचंही हे टेन्शन कमी होणार आहे. आता तुम्ही म्हणाल अभ्यास तर केलाच पाहिजे मग हे कसं शक्य आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा ताण नक्की जाईल. याचं कारण असं की आता बाजारात चक्क होमवर्क करुन देणारी मशीनच आली आहे.
या होमवर्कचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वही दिसत आहे. या वहीमध्ये काही वाक्य काही वेळात लिहिली जात आहे, मात्र तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की कोणताहा विद्यार्थ्यी लिहिताना दिसत नाही तर एक मशीन आहे,जी मशीनच वहीमध्ये वाक्य लिहित आहे.
https://x.com/HasnaZaruriHai/status/1823579810742038673?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1823579810742038673%7Ctwgr%5Ee125fd58037b26bdc9ad2fd91930f55d49d0d7ae%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fviral-video-parents-do-not-have-to-worry-about-childrens-homework-special-machine-will-take-care-of-that-video-goes-viral-srk-21-4545867%2F