प्रत्येक व्यक्तीच्या बालपणाच्या बऱ्याच खास आठवणी असतात. या आठवणीत काही गोष्टी अशा असतात की त्या कधी विसरणे शक्य नसते. तशीच एक गोष्ट म्हणजे आपण आणि आपले आई-वडील त्यांच्या लहानपणापासून खात आलेले’Parle-G’बिस्किट.
जेवढे पार्ले बिस्कीट फेमस आहे तेवढेच पार्ले बिस्कीटवरची पार्ले गर्लही. पार्ले गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या मुलीचा फोटो आता बिस्किटच्या पॅकेटमधून गायब झाला आहे. त्या जागी एका नवीन तरुणाचा फोटो पार्ले बिस्किटच्या पॅकेटवर आलाय. व्हायरल पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतेय. व्हायरल होत पोस्टमध्ये आपल्याला दिसते की, चक्क पार्ले गर्लच्या जागी आपल्याला एका तरुणाचा फोटो दिसत आहे तर पार्ले जी बिस्किटच्या नावाच्या जागी Bunshah-G असे आहे. व्हायरल पोस्ट पार्ले कंपनीने स्वतः पार्ले जी @officialparleg या आपल्या अधिकृत इस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.