Wednesday, April 30, 2025

अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा… संसद प्रकरणातील अमोल शिंदेंच्या पालकांचा इशारा

मुंबई: अमोलने जे काही केलं ते बेरोजगारीच्या कारणामुळं केलं, त्याने सैन्य भरतीचे सहा वेळा प्रयत्न केले होते आणि त्याने रनिंगची चँमिपयनशिपही जिंकली आहे अशी माहिती अमोल शिंदेच्या लकांनी दिली आहे. अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.

गुणवत्ता असून ही मुलास नोकरी नाही मिळाली. रोजगारी करणाऱ्या लोकांच्या मुलास नोकरी लागत नाही का असा प्रश्न धनराज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. मुलाशी बोलणे नाही झाल्यास मी आत्महत्या करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

बुधवारी संसदेची सुरक्षा भेदून चार युवक आतमध्ये गेले, त्यातील दोघांनी लोकसभेमध्ये जाऊन धूर सोडला. दोन तरूणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक आरोपी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील आहे. अमोलने दिल्लीला जाण्याआधी विहीर खोदण्याचे काम केले. त्यातून पाच हजार मजुरी मिळवली. दोन हजार उसणे घेतले. आणि ते घेवून तो 9 तारखेला दिल्लीसाठी निघाला होता. दोन दिवस मजूर म्हणून काम करून लातूरला गेला. तिथे जाऊन भगतसिंह यांचा फोटो विकत घेतला होता. भगत सिंह आणि इतरांचे फोटो असलेला बनियन विकत घेतले. तेच घालून तो संसदेत गेला होता.

पोलीस आणि मिल्ट्री भरतीची आस असलेल्या तरुण, मागील अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी प्रयत्न करीत होता पण हाती निराशा आलेली. आम्ही नवरा बायको दोघेही काम करतोय. त्याला वेळोवळी पैसे दिले होते. देशातील अनेक ठिकाणी जात अमोलने भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र हाती काही लागले नाही. त्याने काय केले हे पोलीस आल्यावर कळाले. आमचं पोरग फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होतं. माझं पोरगं वापस नाही आले तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles