Sunday, December 8, 2024

लोकसभेच्या पराभवाचा बदला घ्यायचाय…डॉ.सुजय विखेंना पारनेरमधून विधानसभा लढण्याचा आग्रह

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांचे मोठे संघटन असून त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आता कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात येत आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

खासदार सुजय विखे यांचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात मोठा कार्यकर्त्यांचा समूह आहे. परंतु एका मंचावर सर्वांना जमा करून माजी खासदार सुजय विखे यांनी निवडणूक लढविल्यास सुजय विखे पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार होतील व खऱ्या अर्थाने लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला घेतल्याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येईल असं मत जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात खासदार असताना त्यांनी अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत त्या विकास कामांच्या जोरावरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता सुजय विखे यांना पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये असलेले एकीचे बळ दाखवून देण्यासाठी माजी खासदार सुजय विखे यांनी आता मतदारसंघातून आमदारकीला उमेदवारी करणे गरजेचे आहे.

खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व विखे समर्थकांची ही इच्छा असून सुजय विखे हे जर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आमदार झाले तर लोकसभेला झालेला पराभव हा खऱ्या अर्थाने बदला ठरणार असलयाचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles