Saturday, January 18, 2025

पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय औटींना जामीन मंजूर

पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी जामिन मंजूर करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: फिर्यादी अॅड. राहुल बबन झावरे यांच्या वनकुटे गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आरोपी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यास गावातून हाकलून देऊन अपमान केलेल्या कारणावरून दि. ६ जून रोजी रोजी पारनेर शहरात गैर कायद्याची मंडळी जमवून राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.या गुन्ह्यात विजय सदाशिव औटी सह २५ जणांवर भारतीय दंड संहिता कलम ३०७ ३२४ ३२३ ३४१ ४२७ १४३ ४१७ १४८ १४८ ५०४ ५०६ आर्म अॅक्ट ३/२५ ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गु.नं. ४१४/२०२४ प्रमाणे दाखल झालेला आहे.. सदर गुन्ह्यात विजय औटी, नंदकुमार औटी, प्रीतेश पानमंद, मंगेश कावरे यांना सदर गुन्ह्यात दि. ७ जून रोजी अटक करण्यात आली होती.

आरोपी विजय सदाशिव औटी यांनी मा. जिल्हा सत्र नायाधीश अहमदनगर यांच्याकडे अॅड. अविनाश गंगाधर लांडे यांच्यामार्फत नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाले. त्यानंतर आरोपी विजय सदाशिव औटी यांच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles