नगर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या खासदार निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये शिवसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात पक्षाने संधी दिली तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.
पारनेर – नगर विधासभेसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे हे उमेदवारीसाठी रिंगणात उतरले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पारनेर तालुक्यात भगवा सप्ताह व मशाल यात्रेचे आणि शिवसंवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पठारे यांनी दिली आहे.