राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांचाही समावेश आहे.याच मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि 2019 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवलेले सुजित झावरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे स्वतः शरद पवार यांनी सुजित झावरे यांना मुंबईत बोलावत पारनेरसह जिल्ह्यात कामाला लागण्याचे सुचवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार निलेश लंके यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.