खासदार निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे , संजय राऊत यांनी सभा घेतल्या, आदित्य ठाकरे यांनी नगर शहरात रॅली काढली. तसेच मी सुद्धा कर्जत-जामखेड भागात सभा घेतल्या व जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळत निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.
निलेश लंके यांच्या विजयात शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकासआघाडीच्या वरीष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत पारनेरमध्ये मशाल पेटवू हा राष्ट्रवादीचा शब्द असल्याने आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पारनेर येथे झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या लोकसभा निवडणुकीच्या बैठकीमध्ये सांगितले गेले होते. पारनेर मधून निलेशभाऊ आता पुढे चालले आहेत आणि ते लोकसभा लढणार आहेत. ते निवडून येतील आणि पारनेरची जागा रिकामी होईल मग काय करावं… तर पारनेरच्या जागेवर मशाल पेटवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे लोक मेहनत घेऊ असा शब्द त्यावेळी निलेशभाऊ यांनी शिवसैनिकांना दिला होता, आता तो शब्द त्यांनी महाविकासआघाडीचा धर्म म्हणून पाळावा आणि मला खात्री आहे की ते सुद्धा शब्द पाळणारे आहेत.