Wednesday, April 30, 2025

गारपिटीने पारनेर तालुक्यात मोठे नुकसान…आ.लंके पहाटेच शेतकऱ्यांच्या बांधावर..

पारनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी तातडीने याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गारपीट झाल्याने फळबागा उद्ध्वस्त झाल्या, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले, कुक्कटपालन व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला. तालुक्यातून रात्री उशिरापर्यंत नुकसानीची अस्वस्थ करणारी माहिती पुढे येत होती. त्यामुळे आमदार लंके यांनी भल्या सकाळीच पाहणी दौरा सुरू केला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला. रात्रभर नुकसान झालेल्या भागातून माहिती येत होते. आमदार लंके सकाळी साडेपाच वाजता घर सोडून बाहेर पडले. थेट शेतकऱ्याच्या बांधावर गेले. शेतकरी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत पाहणी सुरू केली. त्यांनी म्हटले आहे की, पारनेर, पानोली, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगणथेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगांव, म्हसणे सुलतानपुर, गटेवाडी, पठारवाडी, लोणीमावळा या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपीटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles