आ. नीलेश लंके व भाजप नेत्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्याची स्टंटबाजी करण्याऐवजी सरकारच्या दारात जाऊन बसावे आणि तातडीने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले आहे.
झावरे म्हणाले, प्रत्येकवेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची स्टंटबाजी आ. लंके आणि भाजप नेत्यांनी सोडावी. हे केवळ नाटक आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सत्ता यांचीच आहे.
त्यामुळे त्यांनी केवळ पाहणी करण्याचे नाटक न करता शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. मागीलवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथे आणून असेच केले गेले. त्यावेळच्या नुकसानीचा एक रूपया शेतकर्यांना मिळाला नाही.
खा. सुजय विखे पाटील आणि आ. नीलेश लंके यांचे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यांनी बांधावर जाण्याचे नाटक करण्यापेक्षा सरकारच्या दारात जाऊन बसावे. तेथून तातडीने नुकसान भरपाई आणावी, असेही झावरे यांनी म्हटले आहे.