Wednesday, April 17, 2024

लंकेंची मुंबईची रसद तोडणार ! सुजय विखेंसाठी औटींनी कामोठेत आयोजित केला मेळावा

अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच पारनेर तालुक्याचे युवा नेते विजूभाऊ औटी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी कामोठे येथे महिला आणि युवक तसेच अहिल्यादेवीनगरकर परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास खासदार डॉ. सुजय विखे पाटील व प्रशांतदादा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अन्य विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. कामोठे येथील सेक्टर-११ मधील पोलीस स्टेशनच्या समोरील नालंदा बुद्धविहार मैदानावर हा मेळावा होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles