सुपा औद्योगिक वसाहतीतील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी व पारनेरचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी विधानसभा लढवण्याचा निर्णय पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी केला आहे. पारनेर शहरात पाणी आणू शकतो तर पारनेर नगर मतदारसंघासाठी पाणी आणण्यासाठी संघर्ष योद्धा म्हणून काम करू शकतो असेही औटी म्हणाले. त्यांनी कोणत्याही पक्ष प्रवेशा बाबत भुमिका स्पष्ट केली नसुन पक्षीय भूमिकेबाबत विजय औटी यांनी मौन बाळगले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची आपली राजकीय भूमिका विजयादशमीच्या मुहूर्तावर पारनेर येथे स्पष्ट केली. माजी नगराध्यक्ष औटी यांनी विजयादशमीला युवक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन वराळ, दत्तानाना पवार, योगेश रोकडे, संजय मते, माजी नगरसेवक नंदकुमार औटी, सरपंच पंकज कारखिले, प्रितेश पानमंद, भास्कर शिंदे, सरपंच मनोज मुंगसे, दिपक गुंजाळ, गजानन औटी, आदी उपस्थित होते.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी संपले असल्याची चर्चा करतात परंतु मी संपलो असतो तर आज जनता एवढी आली नसती. विजय औटी संपला नाही तुला संपवणार आहे असेही विजय औटी म्हणाले. या माणसाला दैव् मानत होतो परंतु आज तुम्ही बोलण्याची वेळ आली आहे. हंग्याची ग्रामपंचायत तुझ्या ताब्यात ठेवता नसतो असे आव्हान आमदार निलेश लंके यांना विजय औटी यांनी दिले आहे.