सुजय विखेंकडून बंद लिफाफ्यातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ‘प्रसाद’ वाटप सुरू असल्याचं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं होत. रोहित यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना विखे पाटलांनी रोहित पवारांवर पलटवार केला. बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, येथील जनतेने यापूर्वी हे दाखवून दिलेलं आहे, असा खोचक टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
पाथर्डी तालुक्यातील घुंमटवाडी येथे मतदान केंद्रावर कर्मचारी विखेंचे पत्रक दाखवत प्रचार करत असल्याचा व्हिडिओ निलेश लंके यांनी ट्विट केला होता. मात्र, या पत्रकामागची स्टोरीच विखे यांनी सांगितली. मतदान करण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांच्या खिशात हे पत्रक होते आणि मतदान अधिकाऱ्यांनी ते काढून घेतल्यामुळे ते पत्रके त्यांच्याजवळ राहिली. मात्र, फार्स निर्माण करून येथे अधिकारीच प्रचार करत असल्याचा प्रसार करण्यात आल्याचे विखे यांनी म्हटलं.
पाथर्डीत मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडे विखेंचे प्रचारपत्रक कसे? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सगळच सांगितले
- Advertisement -