पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या दोन्ही गटातील झालेल्या हाणामारीत लाट्या काठ्या व गज याचा वापर करण्यात आला.अध्यक्ष संजय मरकड,विश्वस्त विश्वजीत डोके व अन्य दोन जण जखमी झाले आहेत.या जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अध्यक्ष संजय मरकड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे
दरम्यान या हल्ल्यात जखमी असलेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी, हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजाळे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर केला आहे. मोनिका राजळे यांच्या घरी मला मारण्याचा प्लान झाला असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
अनेक दिवसांपासून कानिफनाथ देवस्थानच्या ट्रसमधील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवडी बाबत धुसपुस चालू होती. आज सकाळी देवस्थान समितीच्या सभागृहामध्ये सर्व विश्वस्त मंडळाची अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत निवडीचा वाद उफाळून आला आणि त्यानंतर जोरदार हाणामारीला सुरुवात झाली. विश्वस्त मंडळामध्ये दोन गट पडले असून अनेक दिवसांपासूनचा हा वाद गुरुवारी हाणामारी झाला. या हाणामारीमुळे नाद भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरले आहेत.
मढी देवस्थान हाणामारी प्रकरणाला वेगळं वळण, ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड आरोप
- Advertisement -