Wednesday, April 17, 2024

कर्डिले ज्याच्याबरोबर व पाठीमागे आहेत, त्यांचा पराभव नक्की … शशिकांत गाडेंची टिका

लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आमदार नीलेश लंके यांनी १ एप्रिल पासून जनसंवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून मोहटादेवी गडावरून आमदार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. जनसंवाद यात्रेचा मोहटादेवी गडावरून शुभारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह शिवसेना, काँग्रेस, आपच्या प्रमुख नेत्यांचा उपस्थितीत करण्यात आला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्व सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले ज्याच्याबरोबर व पाठीमागे आहेत, त्यांचा पराभव नक्की आहे. कारण गेल्या अनेक निवडणूकीतील हा अनुभव आहे. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांना आमदार होवू देणार नाही, त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे जोरात प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून सर्व सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना खासदार करा असे आवाहन जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles