Monday, July 22, 2024

लंके खासदार झाले, आता प्रतापकाकांसाठी राजेंद्र फाळके सरसावले, प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी

नगरचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा झाली, अद्यापही ती सुरूच आहे. मात्र, लंके यांना सुरुवातीला उमेदवार म्हणून पुढे करण्यात, अजित पवार गटातून शरद पवारांच्या पक्षात आणण्यात आणि तेथून पुढे प्रचाराची धुरा सांभाळत थेट विजयी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे फाळके आता विधानसभेसाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. ढाकणे यांना उमदेवारी नाही मिळाली तर जिल्हाध्यक्षपद पणाला लावण्याची तयारी त्यांनी बोलून दाखविली आहे.

लोकसभेनंतर आता फाळके विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात नुकताच यासंबंधी मेळावा झाला. तेथे बोलताना फाळके यांनी अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्यासाठी वेळ पडली तर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारीही ठेवल्याचे फाळके म्हणाले. खासदार नीलेश लंके यांच्या विजयासाठी अॅड. ढाकणे यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाचे हे फळ आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी भूमिका फाळके यांनी या मेळाव्यात मांडली. यावेळी प्रदेशचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिश भारदे, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles