Friday, February 23, 2024

पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर…१८ मागण्या मंजूर

नगर – कुत्तरवाडी तालुका पाथर्डी येथिल सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ नोहेंबर २०२३ रोजी मौजे तिसगाव येथे तसेच दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी चांदणी चौक अहमदनगर येथे पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन इतर १८ मागण्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने मंजूर कराव्यात याबाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुळशीराम सानप यांच्या रास्ता रोको आंदोलनाची विशेष दखल घेऊन पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाला असून इतर १८ मागण्या मंजूर केलेले आहेत.
सदर मागण्याचा शासन निर्णय जाहीर करून पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील जनतेला उपाययोजना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने तातडीने द्याव्यात याच कारणामुळे तुळशीराम सानप यांनी दिनांक २४ जानेवारी २०२४ , पाथर्डी तहसील व दिं ३१ जानेवारी २०२४ रोजी तहसील कार्यालय शेवगाव येथे मोर्चा आयोजित करणेबाबत लेखी निवेदन दिले होते. तुळशीराम सानप यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन झाल्यामुळे तसेच मोर्चा आयोजित करण्याचे ठरविल्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने दुष्काळ तसेच इतर १८ मागण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
याचकारणामुळे दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून इतर १८ मागण्या मंजूर केलेल्या असून लवकरच लाभ मिळणार आहे. दुष्काळ, पिककर्जमाफी, चारा डेपो, पिक विमा, शेती अनुदान, नियमित विद्युत पुरवठा, भगवानगड व इतर ७ पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मंजूर करून कामकाज चालू व पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात नगरपरिषद करीता स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मंजूर, २६२ गांवाना शेतीसाठी मुळा, जायकवाडी, कुकडी, कृष्णा खोरे प्रकल्पाचे पाणी मंजूर, शासकीय वस्तीगृह मंजूर, ऊसतोडी कामगारांना ३४ टक्के ऊसतोड दरवाढ मुकादम यांना १ टक्का कमिशन वाढ, पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात २० बस मंजूर, पाझर तलावांचे मजबुतीकरण मंजूर, नवीन बंधारे मंजूर, श्री क्षेत्र भगवानगड ते श्री क्षेत्र गहिनीनाथ गड हा मार्ग मंजूर, पुणे ते औरंगाबाद नवीन एक्सप्रेस मार्ग मंजूर, मोहरी, डमाळवाडी, माणिकदौंडी ,हरीचा तांडा पात्र्याचा तांडा सावरगाव तसेच चेकेवाडी ते मांयबा मार्ग मंजूर, राज्यमार्ग क्र ५० भायगाव ते सुकळी राज्यमार्ग क्र. ६१ तिसगाव ते क-हेटाकळी, राज्यमार्ग क्र.५२ पांढरीपुल ते शेवगाव राज्य मार्ग ७० चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, महिंदा नागताळा, आष्टी खडकत हे सर्व मार्ग हायब्रीड अन्युटी अंतर्गत मंजूर केलेली असून यांच्या डांबरीकरणाचे रुंदीकरण कामकाज १० मी नुसार होणार आहे. गाडीवाट रस्ते, पांधण रस्ते, ग्रामीण मार्ग, इजीमामार्ग, प्रजिमा मार्ग राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मंजूर करण्यात आलेला आहेत.
मा.जिल्हाधिकारी यांनी पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा याबाबत वारंवार पत्रव्यवहार शासनाला केलेला आहे. याबाबत सानप यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles