व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असल्याचे दिसून येतेय. खासगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करून घेण्यासाठी लोकांकडून भरमसाठ पैसे घेते जातात, पण या एम्स रुग्णालयात फुकटात उपचार घेणारी ही महिला बेडवर बसून विडी ओढताना दिसतेय. यावेळी लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने चिडून लोकांना ओरडायला सुरुवात केली, यानंतरही ती कोणाचेही न ऐकता आरामात विडी ओढत बसली. आजूबाजूच्या लोकांनी पुन्हा महिलेला अडवलं आणि विडी फेकायला सांगितली. यानंतर तिला स्वत:ला दम लागल्याने तिने पंलगाच्या काठावर विडी विझवत फेकली.