भारतात गाड्यांच्य मागचे स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही गाड्यांच्या मागे कुटुंबातील सदस्यांची नावे दिसून येते. किंवा बहुतेकवेळा गाडी ही बाबांनी आईनं गिफ्ट केलेली असते. त्यामुळे त्यावर डॅड्स गिफ्टेड वगैरे लिहलेलं पाहायला मिळतं. तसेच दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण गाडयांच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा गाड्यांच्या मागे वेगळ्या प्रकारची वाक्य लिहलेली दिसतात. दरम्यान असंच एक हटके नाव लिहलेली गाडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल. इतका प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल अनेक जण या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती त्याच्या कारमधून व्हिडिओ बनवत आहे. तेवढ्यात त्या व्हिडिओत एक कार दिसत आहे. या कारच्या नंबर प्लेटवरुन ही कार मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील असल्याचं लक्षात येत आहे. ही कार पाहण्यासारखी आहे. या कारच्या मागील बाजूस एक गोष्ट लिहिलेली आहे. गाडीच्या मागील बाजूस ‘म्हशीची भेट’ असे लिहिले आहे. म्हणजे म्हशींमुळे ही गाडी मिळाल्याचे ती व्यक्ती सांगत आहे. ही गाडी म्हशीचे दूध विकून घेतली की म्हशी विकून यावर आता लोक भरपूर कमेंट करत आहेत. @sspsaddampatel नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. तो आतापर्यंत दीड लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
video: शेतकऱ्याचा नाद नाही! म्हशीचे आभार मानत गाडीच्या मागे लिहली भन्नाट गोष्ट
- Advertisement -